भजनी मालिका
← भजनांकडे परत

परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया

parabahma purna alen majhe gharin | na kale antarin nrupa-chiya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया ॥१॥ करीति बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लव-करी ॥२॥ येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्ट-भाव ॥३॥ राजा ह्मणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥ श्रावणवधाचें अघ नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारबधासी ॥५॥ ऐकतांचि हांसे सावध होऊनि । बोलतसे झणीं नामा ह्मणे ॥६॥