भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्म परममूर्ती । परमधाम परात्पर कीर्ति

parabrahma paramamurti | paramadham paratpar kirti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्म परममूर्ती । परमधाम परात्पर कीर्ति । परमप्रियो परंज्योती । श्रुतिस्मृति स्वानुभव ॥१॥ अकळ विकळ निरंजन । ज्ञाताज्ञेय विवेकधन । संशय दृश्य निरसन । विश्वप्रिये ॥२॥ नलिनीकमलविकाशा । नयनघन विश्वेशा । नमन चरणलेशा । चित्सुखा ॥३॥ चराचर सच्चिदानंदांग । शुद्धस्नान शंकर दिव्यांग । विष्णुमूर्ति पांडुरंग । सगुणरुप भीमातटीं ॥४॥ सजळ जलघना । दशन कोटी सूर्यकिरणा । मुक्ताहार जडित रत्ना । किरिटी मुगुट विराजित ॥५॥ नीलोत्पल नीलवर्णा । श्यामसुंदराअ मूर्तिघना । स्तविताम सहस्त्रवदना । नकळे पार तुझा ॥६॥ रजतमाचे मेहुडे । पाहतां तूं न सांपडे । नाहीं तुझिया पडिपाडें । भूमंडळीं दैवत ॥७॥ अनंत ब्रह्मांडधीशा । गुण न वर्णवे परेशा । तुंवा ज्ञानदेव सर्वेशा । अपणामाजीं सामावला ॥८॥ निवृत्ती म्हणे आम्ही दीनें । तारावीं तुम्ही नारायणें । मग काय आदरिलें सोपानें । तेथवरी येणें घडेल ॥९॥ ऐसी निवृत्तिदेवाची स्तुती । ऐकुनियां श्रीपती । नामा म्हणे देव तयाप्रती । बोलत जाले ॥१०॥ नारायणें स्तुति परिसिली । ऐकुनियां अव्यक्त बोली । म्हणे तुवां गीतेची टीका केली । ते प्रमाण आम्हासी ॥११॥ नामा म्हणे हरी देवें । जाणोनियां अंतर्भावें । तुष्टले गुणगौरवें । निवृत्तीसी दिधले ॥१२॥