भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रम्हीं वस्ति कोण्या रुपें करुं

parabramhin vasti konya rupen karun

परब्रम्हीं वस्ति कोण्या रुपें करुं । सकळ हें भरुं आत्मतत्त्वें ॥ देहाचा दीप कीं समत्वें पै ज्योती । एकरुपे वाती सर्वारुपीं ॥१॥ तें रुप सांगा निवृत्ति उदारा । संसारा एकसरा तया माजी ॥२॥ समान निघोटे मोक्षत्वें पैं अवीट । श्रीगुरुनें वाट सांगितली ॥३॥ ज्ञानदेवीं घरवस्तीसी बिढार । तळींवरी साचार एक तत्त्व ॥४॥