भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्मींची गोडी नेणतीं तीं बापुडीं । संसार सांकडीं विषयभरित

parabrahminchi godi nenatin tin bapudin | sansar sankadin vishayabharit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्मींची गोडी नेणतीं तीं बापुडीं । संसार सांकडीं विषयभरित ॥१॥ तूंतें चुकलीरे जगजीवन रक्षा । अनुभवाविण लक्षा नयेचिरे कोणा ॥२॥ जवळीं अलतांचि क्षीर नव्हेसि वरपडा । रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला ॥३॥ दुर्दुरा कमळिणी एके ठायीं बिढार । वास तो मधुकर घेवोनि गेला ॥४॥ मधुमक्षिया मोहोळ रचितां रात्रंदिवरा । भाग्यवंत रस घेऊनि गेला ॥५॥ शेळीस घात-ली उसांची वैरणी । घेऊं नेणे धणी त्या रसाची ॥६॥ नामा म्हणे ऐसीं चुकलीं बापुडीं । अमृत सेवितां पुढीं चवी नेणे ॥७॥