भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहूनि चरण गोड तुझे

parabrahma avinash ani anandaghan | tyahuni charan god tujhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥१॥ तें जीवित्व न सोडीं अगा पंढरिनाथा । जाणसी तत्वता ह्लदय माझें ॥२॥ परात्पर ध्याइजे अपरांपर । त्याचेही जिव्हार पाय तुझे ॥३॥ सच्चिदानंदघन जेथें हरपलें मन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥ नामा ह्मणे तुझीं पाउलें सकुमार । तें माझें माहेर विटेवरी ॥५॥