भजनी मालिका

भजने

देवरे देवरे मोरी घागरीया लालसे । मैं बोलुंगी जशोदा मायछें ॥१॥ हाम रहीन दसे नामछे । तारी भीद नहीं मारो कामछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवलोकीं इंद्र शेवेसी सादर । भूतसेन चाकर होता तेथें ॥१॥ सेवेसी चुकतां होय तूं किरात । ऐसें इंद्रें त्यातें शापियेलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥१॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी ॥१॥ ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥१॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धीसिद्धी द्वारीं । कर जोडूनि तिष्ठती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥ समर्थे आपुल्या नामासी पाहावें । मनीं उमजावें आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥१॥ नसतां पतित कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नाना याति धरुनि धांविन्नलों । धांवतां धांवतां पुढेण सुनाट देखिलें त्याचि पाउलीं मागुतां मुरुडलोंजी सुंदरा ॥१॥

देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून । अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

रचनाकार: संत कान्होबा

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी । आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा तुम्ही आहांत समर्थ । काय मागूं मी पदार्थ ॥१॥ देणे द्याला तरी हेंचि द्यावें । संतचरंण मी वंदावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ