भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी

deva tujhen mi chataru | sahastra eka hakin karun | labh hotase aparu | dhadi dhadiye majhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी । आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥ मुदल पुसतसे वेळोवेळां । हा मनारे पापी चांडाळा । सांग चोविसां आगळा । कवणेपरी न धाय ॥३॥ वासना मागतसे तुज । हे द्यावी जी मज । दाटणी होतसे सहज । ह्मणवोनि मज अंकी-तसे ॥४॥ नामा म्हणे जी दातारा । तुझिये भेटी सारंगधरा । लाभ होतसे अपारा । घडी घडीये विठ्ठला ॥५॥