भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून

deva tujapen majhya purvajanchen run | ahe te kan nedisi ajhun

देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून । अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥ कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें । तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥ आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥ ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव । माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥