भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण

deva tuj maj pan | pahon agala to kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥१॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥ आम्ही धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥२॥ न चले तुझे कांहीं त्यास । आम्ही बळकाविले दोष ॥३॥ दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥४॥ तुका म्हणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥५॥