भजनी मालिका
संत गोरोबा

संत गोरोबा

या संतांची भजने

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥ जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥ मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

काया वाचा मन एकविध करी । एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥ अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडीं । आहे तें ब्रह्मांडीं रूप तुझें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥ विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥ जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥ तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥ एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥ मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥ तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥ नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥ मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥ कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥ माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा