भजनी मालिका
← भजनांकडे परत

रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी

rohidasa shivaraisathi | dili pundalika bheti

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥ पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥ जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥ ३ ॥ नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥ ४ ॥ ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥ ५ ॥ ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥ ६ ॥ भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥ कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥ ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥