भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें

kavan stuti karun kavaniya vache | ogh sankalpache gililen chitten

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥ मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥ दृष्टीचें पहाणें परतले मागुती । राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें । जीवें ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥