भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान

keshavache bheti lagalen pisen | visaralen kaisen dehabhan

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥ न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥