भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे

nirgun rupade sagunache bunthi | viththal nivrutti pravrutti dise

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी । विठ्ठल निवृत्ति प्रवृत्ति दिसे ॥ १ ॥ एक पुंडलिक जाणे तेथील पंथ । तुझा आम्हां चित्त भाग्य योगें ॥ २ ॥ सभाग्य विरळे नामा पाठीं गेले । अभागी ते ठेले मौन्यजप ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां उरल्या उचिता सेवूं सुखें ॥ ४ ॥