भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा

kaisen bolanen kaisen chalanen | parabrahmin rahanen are nama

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥ जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥ म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥