भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं

sthul hoten ten sukshma pain jhalen | man hen budalen mahasukhin

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
स्थूल होतें तें सुक्ष्म पैं झालें । मन हें बुडालें महासुखीं ॥ १ ॥ माझें रूप माझें विरालेसें डोळां । माझें ज्ञान सामाविलें माझें बुबुळां ॥ २ ॥ म्हणे गोरा कुंभार नवल झालें नाम्या । भेटी तुह्मां आह्मां उरली नाहीं ॥ ३ ॥