भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी

vandave kavanasi nindaven kavanasi | limpaven gaganasi kavan limpi

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी ॥ १ ॥ नाहीं जया रूप नाहीं जया ठाव । तेंचि व्यालें सर्व सांगतसे ॥ २ ॥ जीवनीं चंद्रबिंब विंबलें पैं साचें । परि नाहीं तें नितंबिलें जवळें जेवीं ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार नामया जीवलगा । आलिंगन देगा मायबापा ॥ ४ ॥