भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां

deva tuj amhin didhalen thorapan | pahen hen vachan shodhuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥१॥ नसतां पतित कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंज ॥२॥ पतित अमंगळ जालों तुज साह्य । खरें खोटें पाहे विचारोनी ॥३॥ रोग व्याधि पीडा जनांसी नसती । तरि कोण पुसती विद्यालागीं ॥४॥ कल्पनेची बाधा झडपे संसारीं । म्हणुनि पंचाक्षरी श्रेष्ठ जगीं ॥५॥ नामा म्हणे विठो दैवें आलों घरा । नको लावूं दारा आम्हालागीं ॥६॥