भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नाना याति धरुनि धांविन्नलों

deva tuj nenatanna kanhin na sambhalitan nana yati dharuni dhanvinnalon

देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नाना याति धरुनि धांविन्नलों । धांवतां धांवतां पुढेण सुनाट देखिलें त्याचि पाउलीं मागुतां मुरुडलोंजी सुंदरा ॥१॥ आलों भक्तिशाळें अतौता तेथें काहींएक गौरव गमलें । जेणें वेषें आहे तेणें तुजजोगें नव्हे मग ऐसें कांहीं एक गुंथावें केलेंजी सुंदरा ॥२॥ असो येणें औटहातें काई होईल म्हणौनि एकचि वेळा उगविलें । आब्रह्म सकळैक जग आपणापें तुज एकालागीं आणियेलें हो सुंदरा ॥३॥ आतां अवघा तुज डोळां पाहेन दातारा तुज आलिंगीन अवघांचि बाहीं । अवघा मुखीं तुजसी बोलत आहे न ध्याईजे मा चालिली अवघाचि पायींजी सुंदरा ॥४॥ आतां अवघा वेळु अवघेपणें तुज अवघीयातें गिळूनि ठेलों । तुझिये भक्तीची चवी जों लागली तंव अवघेपणा उबगलोंजी सुंदरा ॥५॥ पाहतां दर्पण परता नेलिया दुजेपण रिघे पाहाते भागीं । ऐसे आदि मध्य अवसान जाणोनि अवचितां जडिनलों तुमच्या अंगीं हो सुंदरा ॥६॥ आतां तुज पावेन कवणे दशे नातळसी दुजेपण केलाहो तूंपण नाहीं । तेथें मीपण कैचें होतेंनि मिळणें ते गेलें ठाईच्या ठाईजीं सुंदरा ॥७॥ ऐसा न जेविलाचि जेविला कीं जेविलाचि भुकेला तृप्तातृप्त दोन्ही नाहीं । बापरखुमादेविवरविठ्ठला वरपडा जालों ऐसियासी कीजे काईजी सुंदरा ॥८॥