भजनी मालिका

भजने

कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥ हा गे हा गे हरी । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥ आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च म्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥ अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥ कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥ अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥ पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम