भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईल

kon atan kalikala | yeun bala deil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण आतां कळिकाळा । येऊं बळा देईल ॥१॥ सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥ तुका म्हणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥