भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे

kon jane kona ghade upasana | kon ya vachanaprati pave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥ आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च म्या ॥ध्रु.॥ कुशळ चतुर येथें नपवती । करितील रिते तर्क मतें ॥२॥ तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥