भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा

kon dujen hari sin | sharan din alyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥ तुम्हांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥ तुका म्हणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥