भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं

kothen mi tujha dharun gelen sang | laviyelen jag majhya pathin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलीं च अबोला करूनियां ॥३॥