भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण

kondila ge maj | nirodhuni dvar | rakhan ten baren | yethen kara karan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥ हा गे हा गे हरी । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥ तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥२॥ संशयाचें बिरडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥३॥ तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आम्ही भार वाहिका ॥४॥