भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझे वर्णु गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥१॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझ्या नामाची आवडी । आम्ही विठो तुझीं वेडीं ॥१॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एकरूपें भिन्नत्वे ॥१॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भक्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥१॥ लागेल पालट फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम