भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज

tumachiye dasincha das karuni theva | ashirvad dyava hachi maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें। उत्तरेन खरें भवनदी ॥३॥