भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे

tumhan amhan tuti hoil yavari | aisen maj hari disatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥ सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥ जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥ तुका म्हणे आम्हां हाचि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥