भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं

tujhen varma hatin | dilen sangoniyan santin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥१॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांडवीन पोटीं ॥ध्रु.॥ नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥२॥ तुका म्हणे बळिये गाढे । कळिकाळ पायां पडे ॥३॥