तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा
tujha bharavasa amhan | phar hota purushottama
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
tujha bharavasa amhan | phar hota purushottama
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥
tujha mhanauni jalon utarai | tyachen varma kai ten mi nenen
तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥
tujha mhanavun tuj nenen | aisen kay majhen jinen
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
tujha mhanavuni disaton ga din | hachi abhiman sare tujha
तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥
tujha visar nako majhiya jiva | kshan ek keshava mayabapa
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
tujha sharanagat | janmojanmincha ankit
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥ आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥
tujha sharanagat jhalon mi ankit | karin majhe hit panduranga
तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥
tujha sang pure sang pure | sangati pure vithoba
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥
tujhathayin os | donhi punya ani dosh
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥ झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥
tujhiya dasancha hin jhalon das | na dharin udas mayabapa
तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥
tujhiya par nahin gunan | majhi alpa mati narayana| bhavataraka ji sujana | ek vidnyapana payampashin
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥
tujhiya vinoden amhansi maran | sosiyela shin bahu phere
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥
tujhiye sangati | jhali amuchi nishchiti
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिति ॥१॥ नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥
tujhen angabhut | amhi janaton samasta
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
tujhe thor thor | bhakti kariti vichar
तुझे थोर थोर । भक्ती करिती विचार ॥१॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
tujhe darincha kutara | nako mokalun datara
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥१॥ धरणें घेतलें द्वारांत । नको धरूनी उठवूं हात ॥ध्रु.॥
tujhen nam gaun atan | tujhya rangin nachon tha tha
तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥१॥ तुझ्या नामाचा विश्वास । आम्हां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥
tujhen nam mukhin tayasi vipitta | ashcharya hen chittin vatatase
तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥ काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥
tujhen nam mukhin na ghetan avadi | jivha tochi ghadi jhado majhi
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥ हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
tujhe pay majhe rahiyele chittin | te maj daviti varma deva
तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥१॥ आम्हां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चालवितां ॥ध्रु.॥