भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा

tujha sang pure sang pure | sangati pure vithoba

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥१॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥ रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥२॥ तुका म्हणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥३॥