भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित

tujha sharanagat | janmojanmincha ankit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥ आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥ हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥२॥ तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥३॥