भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा

tujhiya dasancha hin jhalon das | na dharin udas mayabapa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥ आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥२॥ सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों निश्चिंत तुझे पायीं ॥३॥ तुका म्हणे तुज असे माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥४॥