भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त

tujhen angabhut | amhi janaton samasta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें अंगभूत । आम्ही जाणतों समस्त ॥१॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥ ठावा थारा मारा । घरचीया संव चोरा ॥२॥ तुका म्हणे भेदा भेद । करुनि करितसे वाद ॥३॥