भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें

tujha mhanavun tuj nenen | aisen kay majhen jinen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥ तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥३॥