भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे थोर थोर । भक्ती करिती विचार

tujhe thor thor | bhakti kariti vichar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझे थोर थोर । भक्ती करिती विचार ॥१॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥ करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें ॥२॥ तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं ॥३॥