भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा

tujha bharavasa amhan | phar hota purushottama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥ नाम आदित्याचें झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥ सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥३॥ नाम सारखी करणी । कोठे नाही त्रिभुवनी ॥४॥ तुका म्हणे देवा । ब्रिद सोडोनियां ठेवा ॥५॥