भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें

tujha mhanauni jalon utarai | tyachen varma kai ten mi nenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥ देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥ तुका म्हणे बहु नेणता मी फार । म्हणऊनि विचार जाणविला ॥४॥