भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां

tumhan amhansaven na padavi ganthi | aleti jagajethi kalon atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥ तुका म्हणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥