भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान

tumachi ti bheti navhe aisi jali | koradi cha boli bramhadnyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥ तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥ तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥३॥