भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

tumache stutiyogya koten majhi vani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भक्तीभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥ कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥२॥ संतांचे सेवटीं उिच्छष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥३॥ करीं इच्छा मज म्हणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥४॥ तुका म्हणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥५॥