भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा

tumacha tuhmin kela gova | atan chukavitan deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥१॥ कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥ कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥२॥ तुका म्हणे आतां । न सरे हवाले घालितां ॥३॥