भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार

tumhan uddharanen phar | maj dusari nahin thar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥१॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥ बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥२॥ लाविता आभार । तुका विसरलेती फार ॥३॥