भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥ या साहेबाचें झालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥ साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम