भजनी मालिका
← भजनांकडे परत

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा

saten chala kajal ghala tel phani kara | divanadarin baisale parin nachon pher dhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥ या साहेबाचें झालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥ अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥ म्हणे तुका वोळगों एका तोड चिंता माया । देऊंनियां उद्गार जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥