भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील

sadhanen tari hin cha donhi | jari koni sadhil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥ परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥ देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥ तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥