भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचाझाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काम ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥ पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम