भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें

sarva sukhen aji ethen chi volalin | santanchin dekhilin charanambujen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥