भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे

sarpa vinchu dise | dhan abhagya kolase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥ आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥ अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥