भजनी मालिका
← भजनांकडे परत

संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे

sanyog sakalan ase sarvakal | dushchitta gopal ala dise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥ गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥ध्रु.॥ उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥२॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥३॥ लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें झाला देवी ॥४॥ देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरी ॥५॥ हरी तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥६॥